Thursday, July 19, 2007

असे काय आहे..?

सांग नजरेत तुझ्या असे काय आहे...
भेटण्यास पुन्हा नजर अनावर आहे!

सांग मौनात तुझ्या असे काय आहे...
लपवलेस जे तू, मज ऐकायचे आहे!

सांग सुरात तुझ्या असे काय आहे...
भिजले कितीक, परी मी अतृप्त आहे!

सांग स्पर्शात तुझ्या असे काय आहे...
अनोखी प्रीत नवी, मनी अंकुरते आहे!

सांग सहवासात तुझ्या असे काय आहे...
दुरावा हरेक क्षणी युगांचा भासत आहे!

2 comments:

deepanjali said...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर

OLED said...

Hello. This post is likeable, and your blog is very interesting, congratulations :-). I will add in my blogroll =). If possible gives a last there on my blog, it is about the OLED, I hope you enjoy. The address is http://oled-brasil.blogspot.com. A hug.