Thursday, July 5, 2007

मुलगाच हवा...


ई-सकाळवर नेहमी वेगवेगळ्या विषयांवर जनमत चाचणी घेतली जाते. कालच्या ई-सकाळवर "मुलगाच हवा असणारांना गर्भलिंगनिश्चितीचा अधिकार देणे योग्य ठरेल काय" या मुद्द्यावर मतचाचणी घेण्यात आली.
खरचं असे काही अधिकार देणे योग्य आहे का? माझ्या मते असा अधिकार देणे सामाजिकदृष्ट्या फारच घातक आहे...कारण इथे कोणालाही मुलगी नको असते. "मुलगा काय किंवा मुलगी काय.. दोन्ही सारखेच..",असे कोणी कितीही म्हणाले, तरी आपल्याला मुलगी व्हावी असे खूप कमी जणांना वाटत असते.. आणि त्यांच्या मागच्या पिढीचे तर विचारुच नका...आपल्याला होणारे नातवंड हे मुलगाच असावे असा बहुतेकांचा अट्टाहास असतो. खासकरून स्त्रियां...माझ्या मुलाला/मुलीला मुलगा झाला, म्हणजे मी या संसारातून सुटले असे म्हणणा-या कितीतरी आया मी पाहिल्या आहेत. अशी परिस्थिती असताना, जर "गर्भलिंगनिश्चितीचा अधिकार" राजरोसपण मिळाला तर मग काय होईल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. मागेही मी माझ्या ब्लॉगवर "नको असलेल्या मुलींना सरकार संभाळणार.." या विषयावर एक पोस्ट टाकली होती. तिथेही मी ह्याबद्द्ल विचार मांडले होते.
मुळात मुलगी नकोशी का वाटते? ती वंशाचा दिवा नाही म्हणून ? तिची अब्रू आयुष्यभर संभाळावी लागते म्ह्यणून? तिच्या लग्नावर आई-वडिलांना आयुष्यभराची कमाई खर्च करावी लागते म्हणून? मुलीचे आई-वडिल म्हणून कमीपणा घ्यावा लागतो म्हणून? नक्की कशासाठी मुलगी नको असते?
किंवा मुलगा का हवा असतो...? तुमचे नाव तो पुढे चालवू शकतो म्हणून? तो तुम्हाला आयुष्यभर संभाळू शकेल म्हणून ? त्याच्या लग्नात तो भरपूर हुंडा आणेल म्हणून?
कधी बदलणार हे वर्षानुवर्षे चालत आलेले बुरसटलेले विचार...? कधी बदलणार लग्नाच्या नावाखाली, मुलीच्या आई-वडिलांना लुबाडणा-या रुढी आणि चाली रिती? कुठेही गेले तरी आपले शिल धोक्यात येणार नाही याची तिला खात्री कधी मिळेल? कधी घेऊ शकतील मुली मोकळा श्वास? कधी संपेल जन्मालाही येण्याआधीचे त्यांचे मरण?
काहीच करायचे नाही का आपण? आपण एक तर नक्कीच करु शकतो... स्वत:पासून सुरुवात करु शकतो हे सारे बदलण्यासाठी... नाही का?

2 comments:

कोहम said...

apali kaLakaL yogya aahe. paN kaLaabarobar badal hotach aahe. hya goShTilaa veL lagel but eventually equality will prevail like it is prevaling now in western society..

अपर्णा said...

खरं आहे. पण वृत्तपत्रांनी तरी अश्या विषयावर जनमत चाचणी घ्यावी का हा विचाराचा मुद्दा नाही का? सरळ सरळ जनमताचा कौल दिसतो आहे सध्याच्या पुरुष स्त्रियांच्या गुणोत्तरवरून. आणि तरीही अश्या चाचण्या घेतात हे लोक. हे ही चुकीचंच आहे ना? त्यापेक्षा हे गुणोत्तर समतोल करण्यासाठी काय उपाय करावेत ह्यावर लोकांचे विचार जाणून घ्यायल काय हरकत आहे?