Wednesday, June 13, 2007

वेडा पाऊस..

वेड्या पावसाची रिमझिम,
सृष्टी ओलावून जाई..
अनावर थेंबा थेंबातून तो,
सृजनाचे गीत गाई..

वेड्या पावसाची रिमझिम,
जग हे आसावून जाई...
बेधूंद पावसाचे हे क्षण,
नभ सारे कुशीत घेई...

वेड्या पावसाची रिमझिम,
मनही वेडावून जाई,
बरसता तुझ्या आठवणीं,
मन चिंब भिजून जाई..

3 comments:

अपर्णा said...
This comment has been removed by the author.
अपर्णा said...

मस्तय ग कविता... पावसाची वाट तरी किती बघायची? अजून सुरू नाही झाला. अश्यावेळी मग पावसाच्या कवितांवरच समाधान मानायला हवं, हो की नाही?

jay said...

chaan aahe kavita! :)