Wednesday, May 23, 2007

तुम्हाला काय वाटतं?


तुम्हाला जर मी विचारले, दिवाळी कुठल्या महिन्यात येते... किंवा मराठी महिन्यांची नावे न अडखळता सांगा... तर कदाचित तुम्हाला असे वाटेल की हिला वेड वगैरे लागले की काय ? अगदी दुसरी -तिसरीतले मुलंही बारा मराठी महिन्यांची सांगेल किंवा दिवाळी अश्विन महिन्यात असते....
माझाही कालपर्यंत असाच समज होता की, एवढी जुजबी माहिती, प्रत्येक मराठी माणसाला असणारंच...
पण काल माझा हा समज, गैरसमज ठरला....
-------------------------
माझ्या टीममधल्या एकाने ( तो मराठी आहे..) , नवीन फ्लॅट घेतला... मी त्याला सहजच विचारलं,
मी : कायरे, गेलास का नवीन घरी रहायला....
तो : नाही अगं.. तो अधिक की काय सुरु आहे नं ... म्हणून आई म्हणाली की सध्या गृहप्रवेश नाही करायचा...
मी : हो बरोबर आहे... अधिक महिन्यात नवीन काही सुरुवात करत नाहीत.. आणि काही शुभकार्य ही करायचं नसतं...
तो : पण काय असतो गं हा अधिक महिना म्हणजे ?
त्या बापड्याने, अधिक महिना आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला होता बहुतेक..त्याच्या प्रश्नावर, मी आणि अपर्णा त्याला अधिक महिना तीन वर्षांनी कसा येतो...चांद्रमास वगैरे समजावून सांगू लागलो...तर तो म्हणे... तुम्हाला इतकं सगळं कसं काय माहिती.... !!
-------------------------
विषय वाढत गेला आणि मी त्याला सहज म्हणाले की अधिक महिना सोड.. पण वर्षाचे बारा महिने तरी माहिती आहेत ना.. तो हो तर म्हणाला.. पण त्याची गाडी, चेत्र, वैशाख, ज्येष्ठ म्हणत भाद्रपदावरच थांबली.... आम्ही दोघी आश्चर्यचकित....!!! हा इतका भारी... म्हणे, शाळेत तिसरी -चौथीत शिकलेलं आत्तापर्यंत कसं लक्षात रहाणारं... आणि काय उपयोग ते माहिती असून ?? मी म्हणाले, अरे आपले सगळे सण-वार ह्यावरच ठरतात ना...संक्रांत सोडली तर इतर सगळे सण मराठी महिन्यानुसारच येतात... !! ह्यावर काय म्हणाला असेल हा मुलगा...मला फक्त ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये कधीतरी दिवाळी येते हे माहिती आहे...
आणि आपल्याला हे माहिती नाहिये, याची खंतही नाही त्याला !! आम्हालाच त्याने सुनावले, काय फरक पडतो.. ही माहिती नसल्याने ? कितीतरी जण असे असतील की ज्यांना हे लक्षात नसेल किंवा माहिती नसेल... How does it really matter???
त्याच्याशी वाद घालून आम्ही दमलो... आणि "फरक तो पडता है भाई..." असे मनात म्हणत आपापल्या कामाला लागलो...
-------------------------
तुम्हाला काय वाटतं... त्याचं बरोबर आहे?

4 comments:

अपर्णा सरनोबत said...

हं...
मी पण लिहिणार होते हेच.. तू लिहिलंस ते बरं झालं!
btw, तुझ्या ह्या आणि मागच्या पोस्टची शीर्षकं वाचून वपुंचे भांडणारे जोशी आठवले :)}

Sapna said...

हि अशी मराठी माणसे स्वताःला "मराठी" तरी का म्हणवून घेतात??

sonal m m said...

mukta, mala asa vatata ki ha pratyekacha vaiyaktik prashna aahe...marathi mhanavun ghena vagaire theek, pan aapan asha goshtincha trass karun gheun kay upyog?
aapan aaplyala patata te sagla karava...itrankadun apeksha kashala?
pan vicharshil tar malahi tyacha dukha aahech..!!

Mayuresh Gaikwad said...

Mala waat-te ki "Chaitra", "Vaishakh" etc. he hindu mahine aahet, faqt marathi naahit, tar saglya bhashanmadhye aahet, kaaran te Sanskrit madhun aale aahet!