Tuesday, May 22, 2007

तुम्ही काय करता अशा वेळी...?


बाहेर काय मस्त वातावरण आहे....ढग भरुन आले आहेत..उन गायब झाले आहे...छान हवा आहे.. वा-याने गुलमोहोराच्या फांद्या झूलत आहेत..गुलमोहोर, बहावा रस्त्यावर पायघड्या घालत आहेत... आणि अशा वेळी भटकायचं किंवा खिडकीत बसून निसर्ग अनुभवायचं सोडून की-बोर्डवर बोटं आपटत बसणं किती बोरिंग !!
दुपारी जेवण झाल्यावर थोडसं फिरुन आलो..मध्येच उन-सावलीचा खेळ सुरु झाला.. क्षणभर वाटले... अरे श्रावण सुरु झाला की काय ? मग इच्छा नसतानाही पुन्हा ऑफिसमध्ये यावे लागलेच..
ऑफिसमधली समस्त जनता बाहेरच्या जगाशी काहीही देणंघेणं नसल्यासारखी आपापल्या मशिनसमोर डोकेफोडी करते आहे...मला काम सुचतच नाही...आणि मी आणि माझी मैत्रिण अपर्णा उगीचच वेड्यासारखे मिटिंग रुम मध्ये जातो..तिथले पडदे सरकवून बाहेरचे दृश्य डोळ्यात साठवू पाहतो...

तुम्ही काय करता अशा वेळी...?

4 comments:

अपर्णा सरनोबत said...

आपल्यासारखे वेडे लोक अजिबातच नाहीयेत ऒफिस्मधे बहुतेक. आत्तासुद्धा सगळे की-बोर्ड बडवत बसले आहेत :)

मनस्विनी said...

खरचं :)

कोहम said...

ashaveli apan jagala veda mhanaycha...computer tasach chalu thevun bhatakun yaycha.....far far kay? ardha taas ushira paryanta thambava lagel....pan attacha kshan gela ki gela punha yenar nahi...kay barobar na?

मनस्विनी said...

हो अगदी बरोबर !