Monday, May 21, 2007

शुभेच्छा

लाडक्या सोनालीस,
आज तुला काय द्यावे,
यावर खूप विचार केला..
मग लक्षात आले,
लाडक्या बहिणीला द्यायला,
शुभेच्छांहून अधिक मोलाचे,
काय असू शकते...?

नावाप्रमाणेच तुझे, आयुष्य सोनेरी व्हावे,
हास्याची दैवदेणगी सदैव साथ राहू दे !

जीवन तुझे फुलून यावे, प्राजक्ताच्या बहराप्रमाणे...
आणि त्याचा दरवळ दाही दिशांना पसरू दे !

मोठेपण मिळव आभाळाएवढे...
आणि तुझ्या प्रेमाची सावली सर्वांवर पडू दे !

शब्द ही आहेत अपूरे, मनातले सांगायला...
विवाहाच्या मंगलसमयी, माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!!!

No comments: